बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र
भाग – B बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र
१. ‘मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र’ अशी व्याख्या यांनी केली.
(१) वॉटसन
(२) थॉर्नडाईक
(३) विल्हेम बुंट
(४) मॅकड्यूगल
२. एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल, याच्या अंदाजासाठी …. पद्धती अत्यंत उपयुक्त असते.
(१) आत्मनिरीक्षण
(२) सर्वेक्षण
(३) प्रायोगिक
(४) जीवनवृत्तांत
३. कातड्याच्या निर्जीव पट्टयाला अंधारात साप समजून आपण घाबरतो हे …. चे उदाहरण आहे.
(१) समावेश
(२) मनाचा कल
(३) इंद्रियभ्रम
(४) चित्तभ्रम
४. सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती …. यांनी मांडली.
(१) जेरोम ब्रुनर
(२) डेव्हीड असुबेल
(३) डॉ. ब्लूम
(४) अल्बर्ट बांदुरा
५. साधक अभिसंधान पद्धतीचा उद्गाता …. होय.
(१) अल्बर्ट बांदुरा
(२) बी. एफ. स्किनर
(३) डॉ. ब्लूम
(४) थॉर्नडाईक
६. कवी, लेखक, कलाकार, चित्रपट यांतील कल्पना .. प्रकारच्या असतात.
(१) अनुकरणात्मक
(२) सृजनात्मक
(३) व्यावहारिक
(४) पुनरुत्पादित
७. अध्ययनविषयक क्षेत्रीय उपपत्ती …. या मानसशास्त्रज्ञाने मांडली.
(१) कुर्ट लेवीन
(२) स्किनर
(३) अल्बर्ट बांदुरा
(४) कोहलर
८. अध्ययन संक्रमणाची सामान्यीकरणाची उपपत्ती यांनी मांडली.
(१) जड्ड
(२) थॉर्नडाईक
(३) डीसे
(४) बॅग्ले
९. व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रियांतून प्राप्त झालेल्या मर्मदृष्टीद्वारे समस्या सोडविल्या जातात असे…. यांचे मत आहे.
(१) असुबेल
(२) लेवीन
(३) पॅव्हलॉव्ह
(४) कोहलर
१०. कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे … होय.
(१) विस्मरण
(२) स्मरण
(३) अवधान
(४) कल्पना
११. ‘प्रतिक्रियांमधील जोश किंवा आवेश वाढविणारी स्थिती म्हणजे प्रेरणा’ असे …. यांनी म्हटले आहे.
(१) जूजेरी
(२) कोम्बज
(३) स्निग
(४) लिंडस्ले
१२. सायकलवर तोल सांभाळता आला की, स्कूटर किंवा मोटारसायकल शिकण्यास त्याचा उपयोग होतो हे …. या संक्रमणाचे उदाहरण आहे.
(१) धन
(२) ऋण
(३) शून्य
(४) यांपैकी नाही
१३. विकास अवस्थेतील वयोगट ६-१२ वर्षे या कालावधीला असे म्हणतात.
(१) शैशवावस्था
(२) किशोरावस्था
(३) कुमारावस्था
(४) पौगंडावस्था
१४. स्मृती म्हणजे नवा अनुभव असे यांनी म्हटले आहे.
(१) स्टाऊट
(२) रॉस
(३) एबिंगहॉस
(४) मन
१५.चित्रकार चित्र रेखाटण्यात इतका रंगून जातो की त्याला स्थळकाळाचे भान राहत नाही हे …. अवधानाचे उदाहरण होय.
(१) अभ्यस्त
(३) अनैच्छिक
(२) ऐच्छिक
(४) वरीलपैकी कोणतेही नाही
१६. बाह्य उद्दिपकासंबंधी मज्जातंतूमार्फत मेंदूकडे पोहचविल्या जाणाऱ्या प्राथमिक स्वरूपाच्या मानसिक क्रियेला म्हणतात.
(१) अवबोध
(२) प्रतिमा
(३) संवेदना
(४) कल्पना
१७. ‘बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती’ असे यांनी म्हटले आहे.
(१) स्टर्न
(२) मॅकड्यूगल
(३) गेटस्
(४) विल्सम जेम्स
१८. आकलन, शोध, दिशा व टीका हे बुद्धीचे चार पैलू आहेत असे …. यांनी मांडले.
(१) विल्यम स्टर्न
(२) टर्मन
(३) थॉर्नडाईक
(४) अल्फ्रेड बिने
१९. शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचे साहाय्य असले पाहिजे असा विचार …. यांनी मांडला.
(१) स्पिअरमन
(२) थर्स्टन
(३) गिलफोर्ड
(४) डॅनियल गोलमन
२०. साध्य गाठण्यास प्रवृत्त करणाऱ्या, विशिष्ट दिशेने वाटचाल करावयास लावणाऱ्या आणि वर्तनासाठी उत्साह टिकवून धरणाऱ्या शक्तींचे मिश्रण म्हणजे …. होय.
(१) भावना
(२) धारणा
(३) प्रेरणा
(४) बुद्धिमत्ता
२१. अध्यापन हे अध्ययनांगी होण्यासाठी काय आवश्यक आहे?
(१) प्रवर्तन
(२) बक्षीस
(३) शिक्षा
(४) साहित्य
२२. इसवी सन १९२१ साली दक्षिणामूर्ती येथे ‘बालमंदिर नावाची शिशुशाळा …. यांनी सुरू केली.
(१) अनुताई वाघ
(२) सावित्रीबाई फुले
(३) रमाबाई रानडे
(४) गिजुभाई बधेका
२३. अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक…. हे आहेत.
(१) हर्बर्ट थेलन व जॉन ड्यूई
(१) फॅनी शॅफेल व जॉर्ज शंफेल
(३) मार्शा वील व
(४) जॉर्ज ब्राऊन व विल्सम शू
२४. सजीवांची लक्षणे हा पाठ शिकविताना शिक्षकांनी सुरुवातीला विद्यार्थ्यांकडून सभोवताली असणाऱ्या सजीवांची माहिती काढून घेतली. येथे शिक्षकांनी अध्यापनाचे कोणते सूत्र वापरले ?
(१) मूर्ताकडून अमूर्ताकडे
(२) ज्ञाताकडून अज्ञाताकडे
(३) सुगमाकडून संकीर्णाकडे
(४) विशिष्टाकडून सामान्याकडे
२५. यशस्वी अध्यापन म्हणजे काय ?
(१) १००% निकाल
(२) सर्व विद्यार्थ्यांनी प्राविण्यासह उत्तीर्ण होणे.
(३) परिणामकारक अध्ययन
(४) विद्यार्थ्यांचे यश
२६. क्रियात्मक क्षेत्रातील विकासाच्या टप्प्यांचा योग्य क्रम कोणता ?
(१) स्वाभाविकीकरण-अचूकता संधीकरण-अनुकरण-क्रियाकौशल्य
(२)अनुकरण-स्वाभाविकरण-क्रियाकौशल्य-अचूकता-संधीकरण
(३) अनुकरण-क्रियाकौशल्य-संधीकरण-अचूकता स्वाभाविकीकरण
(४) अनुकरण-क्रियाकौशल्य-अचूकता संधीकरण-स्वाभाविकीकरण
२७. खाली काही वर्तनबदल दिले आहेत. त्यांपैकी बोधात्मक वर्तनबदल कोणता आहे तो ओळखा :
(१) शारदा सुंदर भरतकाम करते.
(२) राजूचे त्याच्या कुत्र्यावर प्रेम आहे.
(३) विनित परिच्छेद वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे सोडवितो.
(४) सुनिताला शंख शिंपले जमविण्याचा छंद आहे.
२८. खालीलपैकी कोणती मुले विशेष शिक्षणाची गरजा असणारी नाहीत हे सांगा :
(१) बौद्धिकदृष्ट्या मागासलेली
(२) उच्च दर्जाची बुद्धिमत्ता असलेली
(३) अध्ययन अक्षमता असलेली
(४) अध्ययन क्षमता असलेली
२९. अध्ययनात क्रियाशीलता कोणत्या स्वरूपाची असते ?
(१) बौद्धिक व भावनिक
(२) शारीरिक व मानसिक
(३) फक्त बौद्धिक
(४) फक्त सामाजिक
३०. अध्यापनशास्त्र म्हणजे :
(१) पद्धती व प्रतिमान
(२) तत्त्वे व नियम
(३) अध्यापन सूत्रे
(४) वरील सर्व
वरील सर्व प्रश्नांची उत्तरे खालील व्हिडिओ दिली आहेत.
व्हिडिओ काळजीपूर्वक पहा