Child Psychology and Psychology of Study Teaching

केंद्रप्रमुख परीक्षा टेस्ट सिरीज

बाल मानसशास्त्र व अध्ययन अध्यापनाचे मानसशास्त्र

Child Psychology and Psychology of Study Teaching
केंद्रप्रमुख परीक्षा टेस्ट सिरीज

प्रश्न 1)एडवर्ड थॉर्न डाईक प्रयत्न प्रमाद अध्ययन पद्धतीची मांडणी केली आहे ती …….. वर आधारित आहे.
1.अध्ययन अध्यापन पद्धती
2.चेतक प्रतिसाद
3.अध्यापन पद्धती
4.यापैकी नाही
प्रश्न 2)नवीन दृष्टिकोनातून वस्तूची रचना करण्याची पद्धती म्हणजे सर्जनशीलता होय .
– ब्रुनर –
1.हे विधान बरोबर आहे.
2.हे विधान चूक आहे.
प्रश्न 3)थॉर्न डाईक च्या मते,
१) व्यक्ती पूर्वीच्या प्रयत्नातील सुखा टाळून सुधारित प्रयत्न करते यास प्रयत्न प्रमाद पद्धती म्हणतात.
२) थॉर्न डाईक ने मांजरावर प्रयोग करून अध्ययनाचे प्रमुख तीन नियम मांडले—– तयारीचा नियम, सरावाचा नियम व परिणामाचा नियम.
1)वरील दोन्ही विधाने बरोबर आहेत
2)वरील दोन्ही चूक आहे
3)फक्त विधान क्रमांक एक बरोबर आहे
4)फक्त विधान क्रमांक दोन बरोबर आहे
प्रश्न 4)रशियन मानसशास्त्रज्ञ इव्हान पॅव्हलाव्ह यांनी ही…….. अध्ययन उपपत्ती मांडली.
1)प्रयत्न प्रमाद पद्धती
2)अभिजात अभिसंधान
3)साधक अभिसंधान
4)समष्टीवादी
प्रश्न 5)विशिष्ट उद्दिष्ट पूर्तीसाठी जेव्हा एखादी क्रिया साधणीभूत होते तेव्हा त्यास……. म्हणतात.
1)प्रयत्न प्रमाद पद्धती
2)साधक अभिसंधान उपपत्ती
3)अभिजात अभिसंधान उपपत्ती
4)यापैकी नाही
प्रश्न 6) चुकीचा पर्याय निवडा
१) डेव्हिड आसूबेल —-अर्थपूर्ण शाब्दिक अनुदेशन
२) रॉबर्ट गॅग्ने—–श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती
३) बेंजामिन ब्लूम—–प्रभुत्व अध्ययन उपपत्ती
४) कर्ट लेविन —–क्षेत्रीय अध्ययन उपपत्ती
५) टॉलमन— सामाजिक अध्ययन उपपत्ती
चुकीचा पर्याय ओळखा.
1)पर्याय क्रमांक चार
2)पर्याय क्रमांक पाच
3)पर्याय क्रमांक दोन
4)पर्याय क्रमांक तीन
प्रश्न 7)एका विषयाचे अध्ययन दुसऱ्या विषयाच्या अध्ययनात अडथळा निर्माण करते यास….. म्हणतात.
1.ऋण संक्रमण
2.धन संक्रमण
3.शून्य संक्रमण
4.यापैकी नाही
प्रश्न 8)…..व …….समावेशनाच्या माध्यमातून व्यक्ती समायोजन साधते असे पियाजे म्हणतात
1)अध्ययन ,अध्यापन
2)चुका ,शिका
3)सात्मिकरण, समावेशन
4)यापैकी नाही
प्रश्न 9)लेवीन टर्मन या मानसशास्त्रज्ञाने 140 पेक्षा अधिक बुद्ध्यांक असणाऱ्या व्यक्तींचा अभ्यास करण्यासाठी…….. ही पद्धती वापरली.
1.प्रायोगिक पद्धती
2.निरीक्षण पद्धती
3.जीवनवृत्तांत पद्धती
4.वैकासिक पद्धती
प्रश्न 10
१) साध्य गाठण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या विशिष्ट दिशेने वाटचाल करावयास लावणाऱ्या व वर्तनाचा उत्साह टिकून ठेवणाऱ्या शक्तींचे मिश्रण म्हणजे प्रेरणा होय.
२) प्रेरणाचक्र गरज ,अस्वस्थता ,प्रयत्न ,समतोल, समाधान अशा पद्धतीने होते.
1)दोन्ही विधाने बरोबर आहेत
2)दोन्ही विधाने चूक आहेत
3)फक्त विधान क्रमांक एक बरोबर आहे
4)फक्त विधान क्रमांक दोन बरोबर आहे
प्रश्न 11)अध्ययन सिद्धांत व पुरस्कर्ते यांच्या जोड्या दिल्या आहेत. चुकीचा पर्याय निवडा.
१) मनःशांतीवादी सिद्धांत——वूल्फ
२) अनुभवपुंज सिद्धांत ——हर्बार्ट
३) बोधात्मक क्षेत्रीय सिद्धांत——लेविन, ब्रूनर
४) नैसर्गिक प्रगटीकरण सिद्धांत —-कोहलर
प्रश्न12.विकास अवस्था व वयोगट या संदर्भात चुकीची जोडी ओळखा
शैशवावस्था – तिसऱ्या आठवड्यापासून दोन वर्षापर्यंत
पूर्व बाल्यावस्था — एक ते दोन वर्ष
कुमारावस्था – 13 ते 19 वर्ष
तारुण्यवस्था – 20 ते 40 वर्षे
प्रश्न 13.A)इसवी सन 1896 मध्ये जर्मनीतील मानसशास्त्रज्ञ हरिपाठ याने मानसशास्त्र हा ग्रंथ लिहिला.B) हरिपाठ अध्यापनाच्या पंचपदीची मांडणी केली.
1.फक्त विधान A बरोबर आहे
2.फक्त विधान B बरोबर आहे.
3.दोन्ही विधाने बरोबर आहेत.
4.दोन्ही विधाने चूक आहेत.
प्रश्न 14अध्ययन संक्रमणाचा कोणता प्रकार आहे?
1.धन संक्रमण
2.ऋण संक्रमण
3.शून्य संक्रमण
4.वरील सर्व
प्रश्न 15)बुद्धिमापनाच्या क्षेत्रात ————– यांनी मौलिक कार्य केल्याने त्यांना बुद्धिमापनाचा जनक म्हणतात.
1.थॉमसन
2.अल्फ्रेड बीने
3.हॉवर्ड
4.गिलफर्ड
प्रश्न16)अवधानाच्या स्वरूपावरून त्याचे प्रकार पडतात .
खालीलपैकी कोणता अवधानाचा प्रकार नाही?
1)ऐच्छिक अवधान
2.अनैच्छिक अवधान
3.अभ्यस्त अवधान
4.नियमित अवधान
प्रश्न 17.बुद्धीगुणांकाचे कोणते सूत्र आहे ?
1.बुद्धिगुणांक = मानसिक वय ÷ शारीरिक वय × 100
2.बुद्धिगुणांक = शारीरिक वय ÷ 3.मानसिक वय × 100
4.यापैकी नाही
प्रश्न 18.उत्तर बाल्यावस्थेचा कोणता कालावधी आहे?
1.दोन वर्षापासून सहा वर्षे पूर्ण होईपर्यंत
2.सहा वर्षापासून बारा वर्ष पूर्ण होईपर्यंत.
3.तिसऱ्या आठवड्यापासून दोन वर्षापर्यंत
4.तेरा वर्षापासून 19 वर्ष पूर्ण होईपर्यंत
प्रश्न 19.अध्ययनावर परिणाम करणारे खालीलपैकी कोणते घटक आहेत ?
1.अध्ययनार्थीशी संबंधित घटक
2.शिक्षकांशी संबंधित घटक
3.शाळेशी संबंधित घटक
4.कुटुंबाशी संबंधित घटक
5.वरील सर्व
प्रश्न 20.स्मरण प्रक्रियेतील खालीलपैकी कोणता घटक नाही?
1.प्रत्यावाहन
2.धारणा
3.ग्रहण
4.यांत्रिक स्मरण
प्रत्याभिज्ञान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!