Child Psychology and Psychology of Study Teaching

बाल मानसशास्त्र व अध्ययन अध्यापनाक शास्त्र पेपर 2

बाल मानसशास्त्र

विषय : बालमानसशास्त्र व शैक्षणिक मानसशास्त्र

1) ग्रीक तत्त्ववेत्ता …….. यांनी ‘डी ॲनिमा’ हा ग्रंथ लिहून मानसशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात केली.
अ) ॲरिस्टॉटल ✅
ब) हरलॉक
क) मॅकड्यूगल
ड) यापैकी नाही
2) प्लेटोने …….. या ग्रंथातून व्यक्ती भिन्नतेसंबंधी विचार मांडलेले होते.
अ) रिपब्लिक ✅
ब) डी ॲनिमा
क) यापैकी नाही
ड) मानसशास्त्र
3)
(१) मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित वर्णनात्मक शास्त्र आहे. — मॅकड्यूगल
(२) आत्म्याचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. — ॲरिस्टॉटल
अ) दोन्ही विधाने चूक आहेत.
ब) दोन्ही विधाने बरोबर आहेत. ✅
क) फक्त विधान क्रमांक एक चूक आहे.
ड) फक्त विधान क्रमांक दोन चूक आहे.
4) …….. यांनी 1879 मध्ये जर्मनीतील लिपझिग येथे मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा सुरू केली.
अ) वॉटसन
ब) मॅकड्यूगल
क) ॲरिस्टॉटल
ड) विल्यम वुंट ✅
5)(१) बोधावस्थेचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. — विल्यम वुंट
(२) मानवी वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. — जे. बी. वॉटसन
अ) विधाने चूक आहेत
ब) दोन्ही विधाने बरोबर आहेत ✅
क) फक्त विधान क्रमांक एक बरोबर आहे
ड) फक्त विधान क्रमांक दोन बरोबर आहे
6) …….. यांनी मानसशास्त्राचा मानवतावादी पाया घातला.
अ) मॅकड्यूगल
ब) वॉटसन
क) माॅस्लो ✅
ड) प्लेटो
7)(१) मानवी मनाचे बोध व अबोध असे दोन भाग पाडले. — फ्रॉईड
(२) मानवी वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. — वॉटसन
अ) विधान क्रमांक एक बरोबर असून विधान क्रमांक दोन चूक आहे
ब) दोन्ही विधाने चूक आहेत
क) दोन्ही विधाने बरोबर आहेत ✅
ड) फक्त विधान क्रमांक दोन बरोबर आहे
8) ‘प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक’ म्हणून कोणाला ओळखले जाते?
अ) विल्यम वुंट ✅
ब) वॉटसन
क) माॅस्लो
ड) मॅकड्यूगल
9) …….. यांनी चेताविज्ञानाचा उपयोग करून बुद्धिमत्तेची उपपत्ती मांडली.
अ) मॅकड्यूगल
ब) माॅस्लो
क) हावर्ड गार्डनर ✅
ड) प्लेटो
10) एकोणिसाव्या शतकात मानसशास्त्रातील आत्मनिष्ठता कमी होऊन त्यात …….. येऊ लागली.
अ) वस्तुनिष्ठता ✅
ब) काल्पनिकता
क) निरीक्षण क्षमता
ड) यापैकी नाही
11) …….. यांनी 1879 मध्ये जर्मनीतील लिपझिग येथे मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा सुरू केली.
अ) ॲरिस्टॉटल
ब) मॅकड्यूगल
क) विल्यम वुंट ✅
ड) यापैकी नाही
12) ‘प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक’ असे कोणाला म्हटले जाते?
अ) ॲरिस्टॉटल
ब) वॉटसन
क) विल्यम वुंट ✅
ड) फ्रॉईड
13) चुकीचा पर्याय निवडा.
अ) मानवी वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र – जे. बी. वॉटसन
ब) अबोधावस्थेतील अनुभवांचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र – सिग्मंड फ्रॉईड
क) मानवी मनाचे अनुभवमिश्रित वर्णनात्मक शास्त्र म्हणजे मानसशास्त्र – मॅकड्यूगल
ड) आत्म्याचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र – वुंट ❌ (चुकीचा पर्याय)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!