बाल मानसशास्त्र व अध्यापन पद्धती
प्रश्न 1) अ) विशिष्ट उद्दीपक, विशिष्ट प्रतिसाद अशा स्वरूपाचा संबंध अभिसंधान अध्यापनात असतो. ब)वर्तनाचा विशिष्ट प्रकार घडण्यासाठी प्रशिक्षणाचा उपयोग केला जातो.
1) दोन्ही विधाने बरोबर आहेत
2) विशेष विधान – चूक आहे
3) विधान
(अ) बरोबर, विधान
(ब) चूक
4) सांगता येत नाही
प्रश्न 2) खालीलपैकी कोणता अध्यापनाचा प्रकार नाही?
1) अनुदेशन
2) अभिसंधान
3) उद्दीष्ट
4) संस्करण
प्रश्न 3) फिलिप जॅक्सन यांनी अध्यापनाच्या ज्या तीन अवस्था सांगितल्या आहेत त्या खाली दिल्या आहेत. चुकीचा पर्याय निवडा.
1) प्रथमावस्था – अध्यापनाचे नियोजन
2) द्वितीयावस्था – आंतरक्रियात्मक अवस्था
3) तृतीयावस्था – आंतरक्रियात्मक अवस्था
4) चतुर्थावस्था – मूल्यमानात्मक अवस्था
प्रश्न 4) आधार पद्धती ही ……… विषयाची विशेष पद्धती आहे.
1) मराठी
2) हिंदी
3) इतिहास
4) गणित –
प्रश्न 5) अ) इतिहासातील प्रत्यक्ष घटनेची संबंधित बाबी प्राथमिक आधारस्त्रोत असतात. उदा.: शिलालेख, ताम्रपट, वास्तू
ब) ऐतिहासिक घटनांशी संबंधित नसलेल्या तिसऱ्या व्यक्तीकडून दिलेली माहिती ही दुय्यम आधारस्रोतात येते. उदा. बखरी, दंतकथा *l
1) दोन्ही विधाने बरोबर आहेत
2) फक्त विधान अ बरोबर
3) फक्त विधान ब बरोबर
4) दोन्ही विधाने चूक
प्रश्न 6) चुकीचा पर्याय निवडा:
1) पुरातत्वीय आधार – प्राचीन स्थापत्य, शिलालेख
2) लिखित आधार – आत्मचरित्र, पत्रव्यवहार
3) मौखिक आधार – दंतकथा, पोवाडे, गाणी
4) पुरातत्वीय आधार – परकीय प्रवास वर्णने, सरकारी हुकूमनामे —
प्रश्न 7) स्वयंशोधन पद्धतीची मांडणी कोणी केली?
1) हेन्री आर्मस्ट्रॉंग
2) जॉन ड्यूई
3) ॲलेक्सबॉर्न
4) यांपैकी नाही
प्रश्न 8) चुकीचा पर्याय जोडा:
i) जॉन ड्यूई – अ) उदगामी पद्धती
ii) ॲलेक्स ऑसबॉर्न – ब) समस्या निराकरण पद्धती
iii) रॉजर बेकन – क) बुद्धिमंथन पद्धती
iv) हेलन पार्कहर्स्ट – ड) अवगामी पद्धती
v) ॲरिस्टॉटल – ई) डॉल्टन पद्धती
1) i ) ब ii) क iii) अ iv) ई v) ड
2) i ) क ii) ब. iii) ई iv) ड v) अ
3) i ) ड ii) ई iii) अ iv) ब v) क
4) यापैकी नाही —
प्रश्न 9) अ) सांघिक अध्यापन म्हणजे ज्यामध्ये दोन किंवा अधिक शिक्षक एकाच वर्गाला नियोजनपूर्वक पाठ्यांशाचे अध्यापन करत असतात.
ब) सांघिक अध्यापनाचे श्रेणीबद्ध सांघिक अध्यापन व समप्रभावी सांघिक अध्यापन असे दोन प्रकार पडतात.
1) फक्त विधान अ बरोबर
2) फक्त विधान ब बरोबर
3) दोन्ही विधाने चूक आहेत
4) दोन्ही विधाने बरोबर आहेत
प्रश्न 10) अ) उदगामी पद्धतीमध्ये अगोदर विद्यार्थ्यांसमोर उदाहरणे ठेवून त्याचे निरीक्षण करून विद्यार्थी नियम किंवा तत्त्व शोधतात
ब) बुद्धिमापन पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांसमोर एखादी समस्या मांडून ती सोडविण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील याची चर्चा केली जाते.
1) फक्त विधान अ बरोबर
2) फक्त विधान ब बरोबर
3) दोन्ही विधाने चूक आहेत
4) दोन्ही विधाने बरोबर आहेत .