Interim Result | 2024 | Scholarship Exam | 5th 8th

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद

महाराष्ट्र राज्य माध्यमिक ब उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कार्यालय इमारत

(दुसरा व चौथा मजला) सर्व्हे नं. ८३२ ए, शिवाजी नगर, पुणे – ४११ ००४.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी)

दि. १८ फेब्रुवारी, २०२४.

अंतरिम निकाल

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक १८ फेब्रुवारी, २०२४ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक

शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी), शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्‍त

जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) चा अंतरिम

(तात्पुरता) निकाल मंगळवार, दि. ३० एप्रिल २०२४ रोजी फफफरणाडल्कुणालयया व

www.mscepune.in

या परिषदेच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात आला आहे. शाळांना आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या लोगीनमधून तसेच पालकांना आपल्या पाल्यांचा निकाल संकेतस्थळावर पाहता येईल.

इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल

निकाल पाहण्यासाठी लिंक शाळास्तर

https://2024.mscepuppss.in/LoginPage.aspx

विद्यार्थी लॉगिन मधून निकाल पाहण्याची लिंक

https://2024.mscepuppss.in/StudentResult.aspx

विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करुन घ्यावयाची असल्यास संबंधित शाळांच्या लोंगीनमध्ये दि. ३०/०४/२०२४ ते

१०/०५/२०२४ या कालावधीत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे. गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक

पेपरकरीता रु. ५०/- याप्रमाणे शुल्काची रक्‍कम ऑनलाईन पेमेंटद्रारे भरणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, इत्यादीमध्ये दुरूस्तीसाठी दि. १०/०५/२०२४ पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सदर अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पध्दतीने पाठविल्यास स्वीकारले जाणार नाहीत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. तसेच शाळा माहिती प्रपत्रात शाळेचे क्षेत्र (शहरी / ग्रामीण) व अभ्यासक्रमात दुरूस्ती करावयाची असल्यास शाळा मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीचे विनंती पत्र पूर्ण माहिती नमूद करून सदरचे पत्र

puppsshelpdesk@gmail.com

या ईमेलवर दि. १०/०५/२०२४ रोजीपर्यंत पाठविण्यात यावे.

विहित मुदतीत आवश्यक शुल्कासह ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जानुसार गुणपडताळणीचा निर्णय संबंधितशाळेच्या लॉगीनमध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३०दिवसांपर्यंत कळविण्यात येईल. विहित मुदतीत ऑनलाईन आलेले गुणपडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल.

उपायुक्‍त

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,

पुणे – ०४.

दिनांक :- ३०/०४/२०२४.

ठिकाण :- पुणे.

8 thoughts on “Interim Result | 2024 | Scholarship Exam | 5th 8th

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!