Presiding Officer Instruction | लोकसभा 2024 | Election

पहिला मतदान अधिकारी मतदार यादीच्या चिन्हांकित प्रतीचा प्रभारी असेल ब मतदाराची ओळख पटविण्याची जबाबदारी त्याची असेल. मतदान केंद्रात प्रवेश केल्यावर मतदार थेट पहिल्या मतदान अधिकाऱ्याकडे जाईल. तो मतदान अधिकारी, मतदाराच्या ओळखीबाबत स्वत:ची खात्री करून घेईल. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी, आयोग, मतदारांची ओळख पटविण्याबाबत आदेश जारी करतो, मतदान केंद्राध्यक्षाने आदेशाचे काळजीपूर्वक पालन करावे. मतदाराने मतदार छायाचित्र ओळखपत्र किंवा आयोगाच्या आदेशात विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे इतर कोणतेही ओळख दर्शविणारे कागदपत्र सादर करणे आवश्यक असेल. मतदाराल मतदान करण्याची परवानगी दिल्यावर, छायाचित्र मतदार यादीच्या चिन्हांकित प्रतीतील त्या मतदाराचे तपशील अंतर्भूत असलेल्या रकान्यात लालशाईने तिरपी रेषेत खूण करण्यात येईल. आणखी, स्त्री ब पुरूष मतदारांच्या संख्येची सुलभ पडताळणी व गणना करण्यासाठी, स्त्री मतदारांच्या अनुक्रमांकाला गोल करण्यात येईल आणि तृतीय पंथी मतदारांच्या अनुक्रमांकाजबळ एक चांदणीची (स्टार) खूण करण्यात येईल. याखेरीज, सांख्यिकीय प्रपत्रे भरण्याची जबाबदारी देखील पहिल्या मतदान अधिकाऱ्याची आहे.

दुसरा मतदान अधिकारी पक्‍क्‍या शाईचा प्रभारी असेल. पहिल्या मतदान अधिकाऱ्याने, मतदाराची खात्री पटविल्यानंतर, दुसरा मतदान अधिकारी, मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर पक्क्या शाईची कोणतीही खूण किंवा डाग नाही ना हे तपासून पाहील व त्यानंतर तो मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर पक्क्या शाईने खूण करील. पक्की शाई, खालील आकृतीत दर्शविल्याप्रमाणे, मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीवरील नखाच्या पुढच्या टोकापासून ते डाव्या तर्जनीच्या पहिल्या सांध्यापर्यंत ब्रशच्या (सोबत दिलेल्या) सहाय्याने लावण्यात येईल . दुसरा मतदान अधिकारी नमुना १७-ए मधील मतदाराची नोंदवहीचा प्रभारी असेल. या नोंदवहीमध्ये ज्यांची ओळख पटली आहे व जो मतदान केंद्रावर मतदान करतो त्या मतदारांचा योग्य रोतीने हिशेब ठेवण्याची जबाबदारी त्या मतदान अधिकाऱ्यावर असेल मतदार यादीच्या चिन्हांकित प्रतीमध्ये दिलेल्या मतदाराच्या अनुक्रमांकाची (नावाची नाही) मतदार नोंदवहीच्या (नमुना-१७ए) स्तंभ-२ मध्ये नोंद घ्यावी. तो त्या मतदाराला मतदान करण्याची परवानगी देण्यापूर्वी मतदारांच्या नोंदवहीत प्रत्येक मतदाराची सही अथवा अंगठ्याचा ठसा घेईल, तो, प्रकरण ४ मध्ये वर्णन केल्यानुसार मतदारांच्या नोंदवहीतील त्याचा (मतदाराचा) तपशील नोंदवल्यानंतर प्रत्येक मतदाराला मतदाराची चिठ्ठी देईल. यावेळी पक्क्या शाईची खूण केल्यानंतर, थोडा अवधी गेला आहे व मतदाराने मतदान केंद्र सोडण्याच्या वेळेपूर्वी ती खूण केलेली शाई सुकली आहे याची खात्री करून घ्यावी. याकरिता, पक्क्या शाईची खूण केल्यानंतर, मतदाराच्या नोंदवहीत सही/स्वाक्षरी घेता येईल. जर एखाद्या मतदाराने मतदार नोंदवहीत त्याची सही करण्यास किंवा अंगठ्याचा ठसा उमठवण्यास नकार दिला तर, त्यास मतदान करण्यास परवानगी देण्यात येणार नाही आणि मतदार नोंदवहीच्या “ शेरा * या स्तंभात * मतदान करण्याचे नाकारले ‘ अशी नोंद करण्यात येईल. मतदान केंद्राध्यक्ष अशा नोंदीखाली सही करील. तथापि, जर एखाद्या मतदाराने, त्याचा मतदार क्रमांक नमुना१७ए मधील मतदार नोंदवहीच्या स्तंभ-२ मध्ये रीतसर नोंदवल्यानंतत आणि नियम ४९एल चा उप-नियम (१) अन्वये आवश्यक असल्याप्रमाणे, त्याने त्यावर त्याची सही केल्यानंतर किंवा अंगठ्याचा ठसा उमटविल्यानंतर, त्याने मतदान न करण्याचे ठरविले असेल तर, “मतदान करण्यास नकार दिला मतदान न करता गेला ” अशा अर्थाचा शेरा तुमच्याद्वारे नमुना १७ ए मधील उक्त नोंदीसाठी लिहिण्यात येईल आणि अशा शेऱ्यासाठी त्या मतदाराची सही किंवा त्याच्या अंगठ्याचा ठसा घेण्यात येईल. अशा प्रकरणी, मतदार नोंदवहीच्या (नमुना १७ए) स्तंभ १ मधील त्या मतदाराच्या अनुक्रमांकामध्ये किंवा त्या लगतनंतरच्या कोणत्याही मतदाराच्या अनुक्रमांकामध्ये कोणताही बदल करण्याची आवश्यकता नाही.

तिसरा मतदान अधिकारी मतदान यंत्राच्या नियंत्रण युनिटचा प्रभारी असेल. तो दुसरा मतदान अधिकारी बसतो त्याच टेबलावर बसलेला असेल. तिसरा मतदान अधिकारी मतदाराला, त्याला दुसऱ्या मतदान अधिकाऱ्याने दिलेल्या मतदाराच्या चिठ्ठीच्या आधारे व त्या चिठ्ठीवर दर्शविलेल्या अनुक्रमांकानुसारच मतदान कक्षात जाण्यास परवानगी देईल. तो, प्रकरण ४ मध्ये तपशीलवार स्पष्टीकरण दिल्याप्रमाणे नियंत्रण युनिटावरील मतदान (बॅलेट) बटण दाबून मतदान कक्षात ठेवलेले मतदान युनिट (युनिटे) सुरू करेल. मतदाराला मतदान कक्षात जाण्यास परवानगी देण्यापूर्वी तो मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर पक्क्या शाईची खूण अजूनपर्यंत स्पष्टपणे उमटली आहे, याची तपासणी व खात्री करून घेईल. (जर पक्क्या शाईची खूण निघाली असल्याचे दिसून आले तर, तर्जनीवर पुन्हा खुण करण्यात येईल.) ज्या मतदान केंद्रात मतदारांची संख्या कमी आहे, तेथे तिसऱ्या मतदान अधिकाऱ्याची कामे मतदान केंद्राध्यक्ष स्वत: करेल,यामुळे मतदान पथकाच्या रचनेत काटकसर होईल.

आपल्या टीम नंबर चे शेवटचे दोन अंक टाकून आपला नंबर कोणत्या गावात मतदान बूथ वर लागला आहे ते पाहू शकता.

महाराष्ट्रातील विधानसभा मतदार संघाची परिपूर्ण सर्व गावे सर्व मतदार केंद्र क्रमांक असणारे नकाशे पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून जिल्हा निवडा व मतदार संघ निवडा आणि show map वर क्लिक करून आपण नकाशा पाहू शकता.

मतदान केंद्राध्यक्षांसाठी सूचना


मतदान केंद्राध्यक्षांसाठी निर्देशपुस्तिका

मतदान केंद्राध्यक्षांसाठी – काय करावे आणि काय करू नये

मतदान केंद्राध्यक्षांसाठी तपासणी सूची

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ – मतदान यंत्र व मतदान कार्यपद्धती प्रशिक्षण व्हिडिओ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!