Samuhdarshak Shabd | समूहदर्शक शब्द

  • मुलांचा – घोळका
  • बांबूचे – बेट
  • गुराचा – कलप
  • शिपायांची – पलटण
  • वस्तूंचा – संच
  • महिलांचे – मंडळ
  • केळ्यांचा – लोंगर / घड
  •  दरोडेखोरांची – टोळी
  • धान्याची – रास
  • तारकाचा – पुंज, समूह
  • काजूची, माशांची – गाथण
  • मुंग्यांची – रांग
  • नारळांचा – ढीग
  • लाकडाची, ऊसाची – मोळी
  • प्रवाशांची – झुंबड
  • सैनिकांचे/ची – पथक / तुकडी / पलटण
  • उतारूंची – झुंबड
  • पाठ्यपुस्तकांचा – संच
  • केसांचा – झुबका, पुजका
  • केसांची – बट, जट, गुतवळ
  • पिकत घातलेल्या आंब्यांची – अढी
  • उपकरणांचा – संच
  • फुलांचा – गुच्छ
  • गाईगुरांचे – खिल्लार
  • गवताची – गंजी, पेंढी
  • मडक्यांची – उतरंड
  • विटांचा, कलिंगडांचा -ढीग
  • नाण्यांची – चळत
  • विमानांचा – ताफा
  • साधूंचा – जथा
  • खो-खो चा – संघ
  • गुलाबांचा – ताटवा
  • गवताची -गंजी
  • वारकऱ्यांची – दिंडी
  • आंब्यांच्या झाडांची – राई
  • प्रश्वपत्रिकांचा – संच
  • उंटांचा, लमाणांचा – तांडा
  • पालेभाजीची – गड्डी / जुडी
  • नोटांची, पोत्यांची – थप्पी
  • करवंदांची – जाळी
  • फुलझाडाचा – ताटवा
  • खेळाडूंचा – संघ
  • भाकऱ्यांची , रुपयांची – चवड
  • यात्रेकरूंचा – जथा
  • जहाजांचा – काफिला
  • वाद्यांचा – वृंद/मेळ
  • द्राक्षांचा – घड, घोस
  • माणसांचा – जमाव
  • नोटांचे – पुडके
  • मेंढ्यांचा कळप
  • वेलींचा – कुंज
  • हरिणांचा – कळप
  • माकडांची – टोळी
  • पक्ष्यांचा – थवा
  • पुस्तकांचा, वह्यांचा – गठ्ठा 
  • फळांचा – घोस/ ढीग
  • किल्ल्यांचा – जुडगा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!