मराठी व्याकरण | काळ |
वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून क्रियेचा बोध होतो , व ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा बोध होतो त्याला मराठी व्याकरणात काळ असे म्हणतात. मराठी व्याकरणात काळाचे मुख्य प्रकार तीन आहेत.
१) वर्तमान काळ
२) भूतकाळ
३) भविष्यकाळ
१) वर्तमान काळ- क्रियापदावरून क्रिया आता घडत आहे असा बोध होत असेल तर त्या वाक्यात वर्तमान काळ आहे असे म्हणतात. क्रिया घडत आहे असा बोध होतो.
उदा- महेश पेरू खातो.
२) भूतकाळ- क्रियापदावरून क्रिया घडून गेली आहे, असा बोध होत असेल तर त्या वाक्यात भूतकाळ आहे असे म्हणतात. क्रिया होऊन गेलेली असते म्हणजेच ती घडून गेलेली पूर्ण झालेली असते.
उदा- महेशने पेरू खाल्ला
३) भविष्यकाळ- क्रियापदावरून पुढे क्रिया घडणार आहे असा बोध होत असेल तर त्या वाक्यात भविष्यकाळ आहे असे म्हणतात. म्हणजेच क्रिया पुढे घडणार आहे. ती आणखी घडलेली नाही घडणार आहे.
उदा- महेश पेरू खाईल.