Celebration Education week in Maharashtra

शिक्षा सप्ताह: शैक्षणिक उत्कृष्टतेचा उत्सव दिवस तिसरा

बुधवार दि. २४ जुलै २०२४ क्रीडा दिन

       नवीन राष्ट्रीय धोरण (NEP 2020 ) मध्ये खेळांना शालेय अभ्यासक्रम व क्रीडा आधारित अध्ययन याचा महत्वपूर्ण भाग असल्याचे नमूद करण्यात आले आहे. नवीन राष्ट्रीय धोरणात स्वदेशी खेळांना अनन्यसाधारण महत्व देण्यात आले आहे. या खेळांच्या माध्यमातून देशाची संस्कृती लोककला यांचा परिचय उत्तम रितीने होऊ शकतो असे या धोरणात अधोरेखित करण्यात आले आहे.या अनुषंगाने केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयातील शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने २१ ऑगस्ट २०२३ रोजी मार्गदर्शक सूचना विकसित केल्या आहेत.

१.विद्यार्थ्याच्या पायाभूत अवस्थेपासूनच खेळ आणि फिटनेसचे महत्त्व पटवून देणे यासाठी- १. खेळ आणि तंदुरुस्तीच्या महत्वाबद्दल जागरुकता वाढविणे.

२. समकालीन खेळांच्या समांतर देशी खेळांना प्रोत्साहन देणे.

३. तरुणांच्या मनात सांघिक भावना आणि शिस्तीची भावना जागृत करणे.

४. राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढवणे.

५. खेळ हा विद्यार्थ्याच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवणे.

६. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी. (विशेषतः भारताचे स्वदेशी खेळ)

७. विद्यार्थ्यामध्ये अभिमान, खिलाडूवृत्ती आणि नैतिक वर्तनाची सकारात्मक वृत्ती विकसित करणे.

८. विद्यार्थ्याना शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि भावनिकदृष्ट्या तंदुरुस्त बनवणे.

९. विविध सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमीच्या व्यक्तींना एका सामायिक व्यासपीठावर एकत्र आणून विद्यार्थ्यामध्ये सांघिक भावना वाढवणे.

१०. खेळातून विद्यार्थ्यामध्ये सामाजिक व नैतिक मूल्ये रुजविणे.

शिक्षण सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी शपथ घेतली जाणार आहे. त्यामध्ये स्वदेशी खेळांना प्राधान्य द्यावे असे म्हंटले आहे. या अनुषंगाने पुढील गार्गदर्शक सूचनांचा अवलंब करावा.शालेय स्तरावर पहिल्या सत्रातील १ ते २ तासामध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध स्वदेशी खेळांचे आयोजन करावे.

 तसेच यासाठी केंद्र शासनाने दिलेल्या ७५ स्वदेशी खेळांची यादी सोबत जोडण्यात आली आहे. स्वदेशी खेळ परिस्थितीनुसार सहजगत्या खेळता येणाऱ्या खेळांची निवड केली जावी.शक्य झाल्यास स्थानिक खेळांच्या स्पर्धा आयोजित केल्यास त्यात विजयी होणाऱ्या संघांचा,खेळाडूंचा यथोचित सन्मान केला जावा.स्वदेशी खेळांच्या आयोजनादरम्यान स्थानिक खेळाडू, शाळा व्यवस्थापन समितीतील सदस्य सहभागी होतील याची दक्षता घ्यावी.

पालक आणि नागरी समाज संस्था यांचे मदत घेण्यात यावी.

 सदर उपक्रमामध्ये विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांचा देखील समवेश करण्यात यावा.

विद्यार्थी आणि समाज यांच्यात खेळाच्या महत्त्वाविषयी अधिक चांगली समज निर्माण होईल. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खेळाची भावना विकसित होईल.

वर्गाबाहेरील शिक्षणाचा अनुभव येईल.

विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, तंदुरुस्ती, निष्पक्षता, संघकार्य आणि एकता ही मूल्ये रुजविली जातील.


आम्ही सर्व खेळाडू अशी शपथ घेतो की आमच्या शाळेच्या क्रिडा महोत्सवामधे आम्ही सर्व खेळामध्ये प्रामाणिकपणे, हिरिरीने आणि उत्साहाने भाग घेऊन सर्व नियमांचे एकनिष्ठेने पालन करु व खऱ्या खिलाडूवृत्तीने वर्तन करुन आपल्या शाळेचा व संस्थेचा सन्मान व खेळाचा गौरव वाढत राहिल असा प्रयत्न करु. जय हिंद


मी खेळाडू म्हणून अशी शपथ घेतो/घेते की, शालेय कीडा स्पर्धेत मी भाग घेत आहे. स्पर्धा आणि खेळाची शान व दर्जा उंचावण्यासाठी माझे कौशल्य पणास लावीन.
स्पर्धा व खेळाच्या अटी आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करेन. पंचांचा निर्णय मान्य करीन. मी माझ्या शाळेचे आणि गावाचे नाव उंचावण्याचा आटोकाट प्रयत्न करीन. खिलाडूवृत्ती, सचोटी, निकोप ईर्षा आणि खेळभावना या गुणांचे तंतोतंत पालन करीन.. जय हिंद.


आम्ही सर्व खेळाडू अशी शपथ घेतो की, आम्ही या क्रीडा महोत्सवात सचोटीने भाग घेऊ. या क्रीडा महोत्सवात होणाऱ्या क्रीडा प्रकारात, आम्ही उत्साहाने सहभागी होऊन उत्तम खेळाचे प्रदर्शन करू, क्रीडा महोत्सवातील सर्व नियमांचे आम्ही एकनिष्ठेने पालन करू व खऱ्या खिलाडूवृत्तीने वागून पंचानी दिलेला निर्णय अंतिम मानून स्पर्धा निकोप वातावरणात पार पाडू. आमच्या शाळेचा सन्मान व गौरव होईल अशा इर्षेने या क्रीडा महोत्सवात भाग घेऊ.
जय हिंद

3 thoughts on “Celebration Education week in Maharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!