कूट प्रश्न दिशा
स्कॉलरशिप परीक्षा, मंथन परीक्षा व सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त घटक
कूट प्रश्न दिशा या घटकावर आधारित व्हिडिओ पहा आणि त्यानंतर खालील सराव पेपर सोडवा.
सिद्धी पूर्वेकडे तोंड करुन उभी आहे. ती डाव्या बाजूस काटकोनात वळली तर तिच्या विरुध्द बाजूची दिशा कोणती?
पूर्व
उत्तर
दक्षिण
पश्चिम
तुमचे तोंड वायव्येस असल्यास तुमच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल?
नैऋत्य
ईशान्य
पूर्व
आग्नेय
अक्षय पूर्वेकडे तोंड करून उभा होता तो तीन वेळा डावीकडे काटकोनात वळला तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेला असेल ?
पूर्व
उत्तर
दक्षिण
पश्चिम
श्याम उत्तरेकडे चालला होता तो डावीकडे दोनदा काटकोनात वळला व पुन्हा उजवीकडे तीन वेळा काटकोनात वळला तर तो कोणत्या दिशेकडे चालला आहे ?
दक्षिण
पूर्व
उत्तर
पश्चिम
ज्योती दक्षिणेला तोंड करुन उभी आहे. ती उजवीकडे काटकोनात पाच वेळा वळली. तर तिचा डावा हात कोणत्या दिशेला असेल?
उत्तर
पश्चिम
दक्षिण
पूर्व
आयुष ईशान्य दिशेला चालत होता. नंतर तो 135° डावीकडे वळाला. व पुन्हा उजवीकडे 45° त वळाला व सरळ चालत गेला तर शेवटी कोणत्या दिशेकडे चालला असेल ?
ईशान्य
वायव्य
आग्नेय
नैऋत्य
असिफ उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. तो 180° घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेला वळला व पुन्हा 135° घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळला. तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे?
आग्नेय
ईशान्य
वायव्य
नैऋत्य
वैष्णव पश्चिमेकडे चालत होता . तो सात वेळा डावीकडे वळला तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल ?
उत्तर
पश्चिम
पूर्व
दक्षिण
समीर दक्षिण दिशेला चालत असताना पाच वेळा काटकोनात उजवीकडे वळला. नंतर तीन वेळा काटकोनात डावीकडे वळला . तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल ?
उत्तर
पूर्व
पश्चिम
दक्षिण
अक्षय नैऋत्येस तोंड करून उभा आहे.तर त्याच्या उजव्या हाताची दिशा कोणती आहे ?
ईशान्य
वायव्य
आग्नेय
नैऋत्य
अभिषेक सूर्यास्त पाहत होता. तो तीन वेळा काटकोनातून उजवीकडे वळला तर त्याच्या डाव्या हाताकडील दिशा कोणती? (2021)
पश्चिम
दक्षिण
पूर्व
उत्तर
अतुल नैऋत्य दिशेला तोंड करून उभा होता. समोरून आलेला अरुण दोन वेळा स्वतःच्या डाव्या बाजूला काटकोनात वळला. तर त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल? (2019)
वायव्य
ईशान्य
नैऋत्य
आग्नेय
राजेश पश्चिमेला 7 किमी सरळ गेला आणि डावीकडे वळून 4 किमी सरळ गेला. पुन्हा तो डावीकडे वळला व आणि 3 किमी सरळ गेला. त्यानंतर उत्तरेकडे 9 किमी सरळ गेला आणि उजवीकडे वळला व 4 किमी सरळ जाऊन तेथे थांबला; सर आरंभ स्थानापासून तो किती अंतरावर आहे? (2018)
7 किमी
13 किमी
9 किमी
5 किमी
वैष्णव आग्नेय दिशेसकडे तोंड करून उभा होता. तो उजवीकडे 45° त वळला. नंतर डावीकडे काटकोनात तीन वेळा वळला. तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल?
दक्षिण
पूर्व
पश्चिम
उत्तर
तनिष्का घरातून बाहेर पडली तेव्हा तिच्या उजव्या हाताची दिशा पूर्व होती. ती डावीकडून तीन वेळा काटकोनात वळली. व पुन्हा उजवीकडून पाच वेळा काटकोनात वळल्यास तिच्या उजव्या हाताची दिशा कोणती असेल?
दक्षिण
पश्चिम
पूर्व
उत्तर
उगवत्या सूर्याला नमस्कार करून सिद्धी 225° वळल्यास तिच्या समोरची दिशा कोणती असेल? दोन अचूक पर्याय निवडा.