Independence Day Speech in Marathi for All Ages | Short, Simple & Powerful
भारतीय स्वातंत्र्य दिन भाषण
स्वातंत्र्यदिन
भारतीय स्वातंत्र्याचा ७८ वा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत या स्वातंत्र्यदिनी आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा !
स्वातंत्र्य या शब्दातील जादू किंवा किमया आपण सर्वजण किंवा किमया आपण सर्वजण किंवा आपली तिसरी पिढी अनुभवत आहे.
जगातील सर्वात मोठ्या लोकशाही गणराज्याचे आपण नागरिक होणार आहोत याचा सार्थ अभिमान आपण बाळगला पाहिजे.
पारतंत्र्याच्या झळा आपण अनुभवल्या नाहीत. ऐकूनच आपला थरकाप उडतो मग आपण हे आपले स्वातंत्र्य अनुभवले तसेच ते अभिमानाने टिकविले पाहिजे त्याच्या सौंदर्यात अस्तित्वात वाढवण्यासाठी एक जबाबदार नागरिक म्हणून कर्तव्य पूर्ण केले पाहिजे.
आपल्या पिढीची हीच खरी जबाबदारी आहे. समाजात वाढत चाललेला अविश्वास, अस्थिरता, अशांतता याला कुठेतरी आपणही जबाबदार आहोत.यांचा विचार आपण केला आहे का?
मी भ्रष्टाचार करत नाही. असे आपण ठामपणे म्हणतो तेव्हा आपण या भ्रष्टाचाराला कुठे नकळत मदततर करत नाहीत ना? याचा विचार सजग नागरिकाने करावा.
अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य या मानवाच्या मूलभूत गरजा पूर्ण होण्यासाठी आपण काही हातभारलावत आहोत की नाही? याचा विचार आपण करावा.
मी समाजाचा घटक आहे याचाच अर्थ समाजातील प्रत्येक घटकाप्रती माझी बांधीलकी, जबाबदारी आहे हे आपण सहजच विसरतो.
“हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.’ असे आपण जाणतो पण हक्का इतकी कर्तव्याचीजबाबदारी आपण घेत नाहीत.
स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय ?
स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय ?.
नागरिकाला हक्क देऊन
कर्तव्याचा ठसा उमठविते
ते खरे स्वातंत्र्य !
मी, माझा पेक्षा आम्हीआमचे, आपले
याची जाणीव करून देते
ते खरे स्वातंत्र्य !
अन्यायाविरुद्ध उभे राहणारे,
समानता आणि समतेची शिकवण देते
ते खरे स्वातंत्र्य !
संविधानाचा अभिमान
इतिहासाचा वारसा जपणारे
ते खरे स्वातंत्र्य!
कर्तव्याला सलाम
हक्काचा पाठपुरावा करते
ते खरे स्वातंत्र्य !
गावागावात झळकणारा तिरंगा आपल्याला त्याग, शांतता, समृद्धीची जाणीव करून देतो. सजग नागरिकाची भूमिका पार पाडण्याची शपथ घेऊन, तिरंग्याला शतशः प्रणास त्रिवार सलाम करून मी थांबते ! धन्यवाद !
लेखिका
स्वाती माणिक कावरे
MA B.Ed , M.Ed.Phd ,SET