World Eye Donation Day | General Knowledge Competition | जागतिक दृष्टिदान दिन | प्रश्नमंजुषा

World Eye Donation Day

World Eye Donation Day G.K.Competition

जागतिक दृष्टिदान दिनानिमित्त सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा

1)  मानवाला प्राप्त होणाऱ्या एकूण ज्ञानापैकी डोळ्यांमुळे —— टक्के ज्ञान प्राप्त होते.

  1. 70%
  2. 28%
  3. 83%
  4. 73%

2)मानवी डोळ्यामध्ये कोणते भिंग असते?

  1. अंतर्वक्र
  2. यापैकी नाही
  3. बहिर्वक्र
  4. दोन्ही ही

3)मानवी दृष्टीपटलातील ——— मुळे रंगांची जाणीव होते.

  1. दंडपेशी व शंकूपेशी
  2. शंकुपेशी
  3. दंडपेशी
  4. यापैकी नाही

4)मानवी डोळ्यासाठी सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर किती असते?

  1. 25सेमी
  2. 3.5 मिमी
  3. 2.5मिमी
  4. 35सेमी

5)दूरदृष्टीचा हा दोष कशामुळे होतो याची कारणे खाली दिली आहेत.,( चुकीचा पर्याय निवडा.)

  1. जवळच्या वस्तूची प्रतिमा दृष्टी पटला च्या मागे पडते.
  2. नेत्रगोल उभट किंवा आखूड झाल्याने होतो.
  3. नेत्रभिंग काहीसे चपटे झाल्याने होऊ शकतो.
  4. जवळच्या वस्तूची प्रतिमा दृष्टीपटलाच्यापुढे पडते

6)जवळच्या वस्तू पाहताना मानवी नेत्रभिंग————

  1. लहान होते.
  2. फुगीर होते
  3. जसेच्या तसे राहते.
  4. गोल फिरते

7)प्रकाश आत येण्यासाठी परितारिकेच्या सहाय्याने बाहुलीची लहान-मोठी होण्याची प्रवृत्ती असते त्या प्रवृत्तीला काय म्हणतात?

  1. समायोजन
  2. अनुकूलन
  3. दूरदृष्टीचा
  4. निकट दृष्टिता

8) रंग आंधळेपणा हा दोष निर्माण होण्याची कारणे खाली दिली आहेत. (योग्य पर्याय निवडा.)

  1. शंकु पेशींची संख्या जास्त असणे.
  2. काही विशिष्ट शंकू पेशींचा अभाव असतो.
  3. दंड पेशींचा अभाव असतो.
  4. यापैकी नाही

9)खालीलपैकी कोणता दृष्टिदोष अनुवंशिक आहे?

  1. निकट दृष्टिता
  2. दूरदृष्टीता
  3. रंगांधळेपणा
  4. यापैकी नाही

10)घड्याळाची दुरुस्ती करणारे , रत्नांची पारख करणारे विशालक म्हणून कोणत्या भिंगांचा वापर करतात?

  1. द्विनाभिक भिंग
  2. अंतर्वक्र भिंग
  3. बहिर्वक्र भिंग
  4. यापैकी नाही

11)साध्या अपवर्तनी दूरदर्शकात ——- बहिर्वक्र भिंगे वापरतात.

  1. चार
  2. एक
  3. दोन
  4. तीन

12)वृद्धदृष्टीचा हा एकच दोष असल्यास कोणत्या भिंगांचा चष्मा वापरतात?

  1. अंतर्वक्र
  2. बहिर्वक्र
  3. अंतर्वक्र व बहिर्वक्र
  4. यापैकी नाही

13)परावर्तनी दूरदर्शकामध्ये कोणते आरसे बसवतात?

  1. दोन्ही अंतर्वक्र आरसे  बसवतात.
  2. दोन्ही बहिर्वक्र आरसे बसवतात.
  3. नेत्रीकेत बहिर्वक्र भिंग व पदार्थ भिंगांच्या जागी अंतर्वक्र आरसा वापरतात
  4. यापैकी नाही.

14)नेत्ररोपण करताना संपूर्ण डोळ्याचे रोपण होत नसून डोळ्याच्या बाहुलीच्या पडद्याचे रोपण होते. ( हे विधान सत्य आहे की असत्य आहे ते ठरवा.)

  1. असत्य
  2. सत्य
  3. सांगता येत नाही.

15)जळती अगरबत्ती हाताने गोलाकार फिरवल्यावर संपूर्ण गोल दिसतो याचे कारण खालीलपैकी कोणते आहे?

  1. दृष्टी सातत्य
  2. दूरदृष्टीता
  3. वृद्ध दृष्टीता
  4. निकटदृष्टिता

2 thoughts on “World Eye Donation Day | General Knowledge Competition | जागतिक दृष्टिदान दिन | प्रश्नमंजुषा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!